रत्नागिरी -जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असतानाच मृतांच्या आकड्यांमध्येही वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 529 जणांचा मृत्यू झाला आहे.
513 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. अहवालानुसार जिल्ह्यात 513 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 513 पैकी 169 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 344 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 513 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 18 हजार पार झाली आहे. तर गेल्या 24 तासांत तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 529 एवढी झाली आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण या एप्रिल महिन्यात आढळत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 18 हजार 046 वर जाऊन पोहचली आहे.
रत्नागिरीमध्ये 513 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 26 जणांचा मृत्यू
रत्नागिरीमध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असतानाच मृतांच्या आकड्यांमध्येही वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 529 जणांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक