महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण : दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर

या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण : दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर

By

Published : Jul 29, 2019, 5:03 PM IST

रत्नागिरी- दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या धरणाला ठिक-ठिकाणी गळती लागली होती. तसेच जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे

दापोलीतील हर्णे खेम धरण गळती प्रकरण : दुरूस्तीसाठी 3 कोटी मंजूर

दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बांधले आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीला सध्या ठीक-ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या 3 गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.

अखेर या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details