रत्नागिरी -जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आणखी 11 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 124वर पोहोचला आहे. अहवाल आलेल्या 11 पैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4वर पोहोचली आहे.
रत्नागिरीत कोरोनाचे ११ नवे रुग्ण, बाधितांचा आकडा १२४वर
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात गुरुवारी रात्री आणखी 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 17 कोरोना अहवालांपैकी 11 नवे रुग्ण, तर 6 जणांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात गुरुवारी रात्री आणखी 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 17 कोरोना अहवालांपैकी 11 नवे रुग्ण, तर 6 जणांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 124वर गेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी -
चिपळूण तालुक्यात कोरोनाचा पहिला, तर जिल्ह्यात चौथा बळी गेला आहे. चिपळूण नारद खेरकी येथील कोरनाबाधित महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. ही महिला मुंबईहून गावी आली होती. तिला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 झाली आहे.