रत्नागिरी- जिल्ह्यात आणखी पाच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रत्नागिरीमध्ये 3 तर लांजातील 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 47 वर पोहचला असून, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे.
हेही वाचा-चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, सोमवारी सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे. एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही.
सोमवारी आढळलेल्या 5 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटर मधील आहेत. तर एक रुग्ण झाडगाव येथील रहिवासी आहे. याव्यतीरिक्त लांजा येथील 2 लहान मुलांचा (वय 9 व 10 वर्षे) अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान यापूर्वी जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या दोन विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा दोन विद्यार्थिनींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह नर्सेसची संख्या 4 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण वाढले...
मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 16 पैकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. या रुग्ण वाढीच्या संख्येने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने अर्धशतक पार केले आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासने दिली आहे.