महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : नेरळमध्ये 48 हजारांची चोरी; तक्रार दाखल होताच दोन तासांत आरोपी जेरबंद

नेरळ शहरातील कुंभारआळी येथे राहणारे नवीन नितीन खराटे यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे हे दरवाजाची लोखंडी जाळी काढून घुसले. त्यानंतर स्वयंपाक घरातील लाकडी कपाटातून चोरट्यांनी ४८ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

By

Published : Jul 12, 2021, 4:08 AM IST

thief arrested after register a complaint in neral police station
नेरळमध्ये 48 हजारांची चोरी; तक्रार दाखल होताच दोन तासांत आरोपी जेरबंद

रायगड - नेरळ शहरात एका घरामध्ये घुसून चोरट्याने तब्बल ४८ हजार रुपये लांबवले होते. ही बाब लक्षात येताच फिर्यादी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ २ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

48 हजार लांबवले -

नेरळ शहरातील कुंभारआळी येथे राहणारे नवीन नितीन खराटे यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे हे दरवाजाची लोखंडी जाळी काढून घुसले. त्यानंतर स्वयंपाक घरातील लाकडी कपाटातून चोरट्यांनी ४८ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर खराटे यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठत घटनेची फिर्याद दाखल केली. यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी एक पथक तयार केले.

हेही वाचा -जळगावकरांसाठी रविवार ठरला अपघातवार; दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे ठार

या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलीस हवालदार अविनाश वाघमारे, आदींचा समावेश होता. या पथकाने घटनास्थळापासून त्यांनी बाजारपेठ अशा सर्व ठिकाणी तपास सुरू केला. अनुभव व तांत्रिक पुरावे यांच्या आधारावर पोलिसांना यश आले. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला चोरलेल्या रोख रकमेसह अटक केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details