रायगड - कोरोना संकटाशी सामना करता एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे प्रत्येक जण लस कधी निघणार याची वाट पाहत होते. एका वर्षांनंतर सिरमने कोरोनावर लस तयार केली आहे. सिरममधून देशात कोविशिल्ड लसीचे वितरण करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही कोविशिल्ड लस दाखल झाली आहे. 9 हजार 700 लस ही ठाणे येथून वाहनाने रायगडात दाखल झाली आहे. पहिल्या टप्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना लसीचे लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 16 जानेवारी पासून जिल्ह्यात प्रत्यक्षात लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.
सिरमची लस रायगडात दाखल
कोरोना महामारीने करोडो नागरिकांचा जीव घेतला आहे. कोविड 19 वर लस शोधण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ वर्षभर करीत होते. मात्र त्यात यश थोडया प्रमाणात मिळत होते. भारतात पुणे येथील सिरम कंपनीने कोरोना लसीचे संशोधन केले आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीकरण मोहीम जोरदार सुरू होणार आहे.