रायगड - युवतीला अश्लील मेसेज पाठवून बदनाम करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत धिंड काढली आहे. सुरेश भिवा देवमुंडे असे या महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
खोपोलीत एका युवतीला अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन शिक्षक सुरेश भिवा देवमुंडे याला झोडपले. तसेच राहत्या भागातून त्याला चोप देत रस्त्यावरून धिड काढत त्याचा चांगला समाचार घेतला. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी देवमुंडेला पुढील कारवाईसाठी अटक केली आहे.