रायगड -खालापूर तालुक्यातील इसांबेवाडी या ठिकाणी डोंगर उत्खनन सुरू आहे. यामुळे भूस्खलन होऊन घरांना नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणावरील काही घरांचे स्थलांतर झाले आहे, मात्र काही घरे अद्याप त्याच ठिकाणी आहेत.
हेही वाचा -ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना गंडा घालणाऱ्या टोळीला खोपोलीत अटक
इसांबेवाडीत सध्या चार घरांचे कुटुंब वास्तव्य करत आहे. मात्र, वाडीतील बाकीच्या घरांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना योग्य मोबदला मिळाला असल्यामुळे ते स्थलांतरीत झाले, असे वाडीत वास्तव्य करीत असलेले कृष्णा पांडू पवार यांनी सांगितले. मात्र, कोणत्या अटीशर्थींच्या आधारावर या आदिवासी बांधवाना स्थलांतरित करण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे एमआयडीसी येणार असल्याच्यी शक्यता आहे, त्यावरून घरे खरेदी केली गेली, अशीही चर्चा आहे.
भरावासाठी डोंगर पोखरले
इसांबे वाडी या ठिकाणी डोंगर पोखरून टाकल्यामुळे भविष्यात भूस्खलन होवून माती जवळपासच्या गावात शिरू शकते किंवा शेती व्यवसायाला धोका निर्माण होवू शकतो. परंतु, याकडे महसूल खात्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच याबाबीला कोणीही गांभीर्याने घेत नाही.