महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकापकडून पनवेलमध्ये पुन्हा एकदा पैसे वाटप; कार्यकर्त्याला रंगेहात अटक

लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एका मतासाठी २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर, आज परत एकदा शेकापच्याच कार्यकर्त्याला अटक झाली आहे.

कार्यकर्त्याला रंगेहात अटक

By

Published : Apr 28, 2019, 3:02 PM IST

Updated : Apr 28, 2019, 3:45 PM IST

रायगड- शेवटच्या टप्प्यातील प्रचार आचारसंहितेनुसार थांबला आहे. पण, राजकीय पक्षाकडून छुप्या रितीने याचे उल्लंघन केले जात आहे. एवढेच नव्हे तर पैशाची प्रलोभने देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. असाच प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. प्रताप आरेकर असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो सुकापूर शहराचा सरचिटणीस आहे.

कार्यकर्त्याला रंगेहात अटक


लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एका मतासाठी २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर, आज परत एकदा शेकापच्याच कार्यकर्त्याला अटक झाली आहे.


प्रताप आरेकरला अटक होताच त्याच्या सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. आपण पकडलो गेलो आहोत हे समजताच आरेकरने पैशांची पिशवी बाजूच्या लाँड्रीत फेकून दिली. या पिशवीत एकूण २९ पाकिटे आढळून आली आहेत. प्रत्येक पाकिटात २२० रुपये सापडले. अशा गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Last Updated : Apr 28, 2019, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details