रायगड - रोहा येथून केळघरमार्गे मुरुडला जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एम. एम. घाडगे यांनी दिली.
केळघरजवळ रोहा-मुरुड मार्ग गेला वाहून, वाहतूक बंद
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दुपारी १२ वाजेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रोहा-मुरुड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे केळघरजवळचा रोहा-मुरुड रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दुपारी १२ वाजेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रोहा-मुरुड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे केळघरजवळचा रोहा-मुरुड रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रस्ताच वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात करून वाहतूक सुरळीत केली जाईल, असे घाडगे यांनी सांगितले.