महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशातून रायगडात आले जोडपे, पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लडवरून भारतात मुंबईत आलेले आणि 8 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आलेली महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर पनवेल कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

रायगडातही परदेशातील कोरोनाचा शिरकाव
रायगडातही परदेशातील कोरोनाचा शिरकाव

By

Published : Dec 29, 2020, 2:12 PM IST

रायगड - इंग्लडवरून भारतात मुंबईत आलेले आणि 8 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आलेली महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर पनवेल कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 जणांची कोविड तपासणी सुरू आहे.

8 डिसेंबर रोजी जोडपे जिल्ह्यात दाखल
खारघर येथील एक जोडपे 8 डिसेंबर रोजी इंग्लडहून मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर दोघे खोपोली येथे आले. कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्य शासनाने आरोग्य विभागला दिले होते. नगरपरिषद आरोग्य विभागाने या जोडप्याची माहिती मिळवली. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी पती आणि पत्नीची कोविड तपासणी करण्यात आली.

पत्नी पॉझिटिव्ह
मंगळवारी दोघांचा कोरोना अहवाल आला असून यात पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पत्नीला पनवेल येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

पनवेल कोविड सेंटरमध्ये पत्नीवर उपचार
परदेशात पुन्हा एकदा नव्या कोरोनाची लाट आली आहे. त्यामुळे भारतातही परदेशातून येणाऱ्या प्रवशामुळे कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची तपासणी केली जात आहे. या तपासणीत रायगड जिल्ह्यातील खारघरच्या जोडप्यापैकी पत्नी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्याच्यावर पनवेल कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली आहे.

संपर्कात आलेल्या 30 ते 40 जणांची तपासणी सुरू
इंग्लड वरून आलेल्या जोडप्याच्या संपर्कात 30 ते 40 जण आले आहेत. त्यांची कोविड तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रसाद रोकडे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details