महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 1, 2021, 8:03 AM IST

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन करत खालापुरात हुक्का पार्टी; पोलिसांचा छापा

खालापूर शहराच्या परिसरातील कलोते रयती गावातील एका फार्महाऊसमध्ये मध्ये विनापरवाना डी.जे. सिस्टीमवर गाणी लावून मनोरंजनाचा कार्यक्रमासह हुक्का पार्टी सुरू होती. मात्र, राज्यात कोरोनाचे निर्बंध कडक केले असताना, नियमबाह्यपणे या ठिकाणी तब्बल ४०० जण मिळून ही पार्टी करत होते.

रायगड - राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामध्ये हॉटेलमधील पार्ट्या, लग्नसोहळे धार्मिक कार्यक्रम या सारख्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. मात्र, अशा परस्थितीत कोरोना नियमांचे उल्लघंन करत सुरू असलेल्या खालापुरातील एका हुक्का पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले आहे.

400 जण आले एकत्र-

खालापुरात हुक्का पार्टी; पोलिसांचा छापा

खालापूर शहराच्या परिसरातील कलोते रयती गावातील एका फार्महाऊसमध्ये मध्ये विनापरवाना डी.जे. सिस्टीमवर गाणी लावून मनोरंजनाचा कार्यक्रमासह हुक्का पार्टी सुरू होती. मात्र, राज्यात कोरोनाचे निर्बंध कडक केले असताना, नियमबाह्यपणे या ठिकाणी तब्बल ४०० जण मिळून ही पार्टी करत होते. या बाबतची विश्वसनीय माहीती खालापूर पोलिसांनी मिळाली होती, प्राप्त माहितीनुसार खालापुरातील कलोते रयती गावच्या हद्दीत कॅम्प मॅक्स या फार्महाऊवर सुरू असलेल्या या पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.

कोरोना नियमांचे उल्लंघन

याठिकाणी उपस्थित असणाऱ्या असंख्य तरुणांनी कोरोना विषाणुचा संक्रमण वाढु नये याकरीता केलेल्या उपाययोजनांचा अवलंब केला नव्हता. तसेच जेवण काउंटरच्या जवळ दाटी वाटीने लोक जेवण घेत होते. तर काही लोक जवळ- जवळ बसून जेवण करीत असल्याचे दिसून आले. तसेच एका लाकडी बाकावर 7 मुले, मुली हुक्का पीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी या पार्टीवर कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले आहे. 1) बिपीन गुलाब राठोड वय-52 वर्षे, 2) हुसैन फकरूद्दीन दिवासवाला (व्यवस्थापक) वय-22 वर्षे, (म्युझिशियन), 3) अरूण विजयशंकर तिवारी वय-32 वर्षे, (कॅशियर), 4) जयेश जगदिश त्रिवेदी वय- 35 वर्षे, (आयटी टेक्नीशियन) , 5) संदिप नरसन्ना निंबेलू वय - 40 वर्षे, (कॅशियर), 6) आदित्य सत्यभ्रत मिश्रा वय- 21 वर्षे, (म्युझिशियन), 7) निल हेमंत जैन वय[- 30 वर्षे, (गायक) , 8) रित राजीव डे वय'- 21 वर्षे (म्युझिशियन) , 9) प्रविण शंकर गोडेकर वय - 42 वर्षे, (हाउसकिंपींग ), 10) दिवास बिपद पाल वय - 848 वर्षे (बेव्हरेज ऑपरेटर) 11) घनशाम कुमार राम वय-27 वर्षे, ( कॅश काउंटर ), 12) विनायक शंकर शिंदे वय - 36 वर्षे (किचन मॅनेजर), 13) प्रफुल हरिभाउ माथुरकर वय-39 वर्षे, (वायरमन), 14) श्रीकांत रामहरि पानीग्राही वय - 27 वर्षे, (साउंड मेन्टनन्स ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तसेच या कारवाईत डि.जे. म्युझीक सिस्टम, हुक्का ओढण्यासाठीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details