रायगड - 33 मावळ मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया होत आहे. यावेळी रायगडमधील खोपोलीत बोहल्यावर चढण्यापूर्वी वधुने तर नेरळ टेप येथे वरांने मतदानाचा हक्क बजावला. या दोघांचे विवाह वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाले. मनीषा नायडू आणि जनार्धन शिंदे, अशी या दोघांची नावे आहेत.
बोहल्यावर चढण्यापूर्वी रायगड जिल्ह्यात वधू, वराने बजावला मतदानाचा हक्क
खोपोलीतील मनीषा नायडू या वधूने तर नेरळ टेप आळी येथील जनार्धन शिंदे या वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.
नववधू आणि वराने बजावला मतदानाचा हक्क
मनीषा नायडू ही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहे. लग्नाच्या दिवशीच मतदान होत असल्याने मला खूप आनंद झाला. तसेच मतदान करणे ही देशसेवा केल्यासारखेच असल्याचे तिने यावेळी सांगितले. तर कर्जत तालुक्यातील नेरळ येथील जनार्धन शिंदे हा तरुणसुद्धा आज आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करणार होता. बोहल्यावर चढण्याआधी जनार्धनने मतदानाचा हक्क बजावला.