महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधकांच्या दादागिरीमुळे यंदाची निवडणूक लढवतोय - सुरेश लाड

आर्थिक कारणामुळे या वेळची निवडणूक मी लढवणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तसेच मतदारसंघातील दादागिरी रोखण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे आमदार सुरेश लाड यांनी स्

आमदार सुरेश लाड

By

Published : Oct 11, 2019, 3:29 PM IST

रायगड -राज्याची विधानसभा निवडणूक दोन आठवड्यावर येऊन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यातील राजकीय समिकरणेही बदलले आहेत. आर्थिक कारणामुळे या वेळची निवडणूक मी लढवणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तसेच मतदारसंघातील दादागिरी रोखण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे आमदार सुरेश लाड यांनी स्पष्ट केले. लाड हे राष्ट्रवादी काँग्रसतर्फे कर्जत विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत.

आमदार सुरेश लाड यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - .... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ

लाड मागील दहा वर्ष या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिकची संधी असताना त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ते शिवसेनेच्याही संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शेवटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रणांगनात पुन्हा उडी घेतली.

प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवारावर लाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, निवडणूक न लढवण्याचे मुख्य कारण हे आर्थिक होते तरीही काही ठराविक लोकांनी सुरू केलेली दादागिरी व दडपशाही तसेच स्वपक्षातील लोकांवरही खोट्या केसेस करून जो दहशतवाद निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना विरोध करण्यासाठी तुम्हीच लढले पाहिजे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आपण ही निवडणूक लढवत असल्याचे लाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा - आम्ही शरद पवारांना स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details