रायगड -अडचणीत अडकलेला किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण देवाला साकडे घालत असतो. आपली मनोकामना पूर्ण झाली की, तो देवाला बोललेला नवस फेडतो. असाच नवस अलिबाग तालुक्यातील हेमनगर ग्रामस्थांनी महेंद्र दळवी आमदार व्हावे, यासाठी देवीकडे केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने आज शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र दळवी यांची शिवनेरी नवरात्रौत्सव मंडळातर्फे फळे, मिठाई, गूळ, नारळ या जिन्नसानी तराजू तुला करून नवसाची परतफेड केली. शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी यांनी हा नवस फेडला आहे.
आमदार महेंद्र दळवी यांची मिठाई, फळे, गुळाने केली तराजू तुला
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महेंद्र दळवी यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेची जागा जिंकावी यासाठी शिवनेरी नवरात्रौत्सव मंडळ हेमनगर, नवीन वाघवीरा तळेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी शाश्वत अशा भवानी देवीकडे साकडे घातले होते.
हेही वाचा -जंगल राजमध्ये बिहारचा विकास होणार नाही, मोदींचा महागठबंधनवर हल्लाबोल
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग-मुरुड मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विजयी झाले. हेमनगर ग्रामस्थांनी देवीकडे घातलेले साकडे पूर्ण झाले. त्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र दळवी यांची फळे, मिठाई, गूळ या जिन्नसानी तराजू तुला केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या या तुला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. तुलेत टाकलेले जिन्नस हे गोरगरीब जनतेला देण्यात आले.