रायगड -अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लॉजिंगचे वीज बिल कमी करण्यासाठी लाच घेताना अलिबाग महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. विशाल बागुल (वय, 32) असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. बागुल याला जिल्हा न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वरसोली येथील लॉजिंगचे वीज बिल कमी करण्यासाठी बागुलने 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. यातील पन्नास हजाराचा पहिला हफ्ता स्वीकारताना लाचलुचपत विभागाने 22 नोव्हेंबरला बागुल याला अटक केली. या प्रकरणाच्या तपासात वीजवितरणाच्या अजूनही काही जणांची नावे येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात लोकशाहीचा खून, तिघे मिळून सरकारचा पराभव करणार'
वरसोली येथे तक्रारदाराचा लॅजिंगचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने लॉजिंगसाठी घरगुती वीज मीटरवरून वीज घेतली होती. या वीज मीटरचे बिल तक्रारदार यांनी भरलेही होते. मात्र, लॉजिंगसाठी बांधलेल्या रुमसाठी व्यवसायिक वीज मीटर घेतले नव्हते, याबाबत त्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधला. मात्र, महावितरण विभागातील अधिकाऱ्यांनी पावले उचलली नाही. महावितरणने तक्रारदाराला व्यवसायिक वीज मीटर नसल्याने 2 लाख 47 हजारांचा दंड आकारला. तक्रारदाराने याबाबत अलिबाग महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला.
हेही वाचा - 'अजित पवार पुन्हा येणार, चंद्रकांत पाटलांसह 35 आमदार आमच्या संपर्कात'
महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांच्याकडे वरसोलीचा पदभार असल्याने तक्रारदार यांनी बागुल यांची भेट घेतली. त्यावेळी वीज बिल कमी करण्यासाठी बागुलने तक्रारदाराकडे 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.