महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्गम ठिकाणी मतदानाच्या साहित्यासह पोहोचले अधिकारी; गावकऱ्यांनी केले स्वागत

वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोचणाऱ्या 'या' पथकातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.

By

Published : Apr 28, 2019, 9:53 PM IST

दुर्गम ठिकाणी मतदानाच्या साहित्यासह पोहोचले अधिकारी; गावकऱ्यांनी केले स्वागत

रायगड - कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चार मतदान केंद्रांवर कर्मचारी साहित्य घेऊन दाखल झाले आहेत. गावकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. मावळ मतदारसंघात 29 एप्रिला होणाऱ्या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत.


जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणाऱ्या 'या' पथकांशी सातत्याने संवाद साधत आहेत. वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोचणाऱ्या 'या' पथकातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. गावकऱ्यांनीदेखील 'त्या' मतदान अधिकाऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन तालुके मावळ मतदारसंघात येतात. स्थानिक गावकरी, तलाठी, तसेच इतर गावकऱ्यांनीदेखील 'या' कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली.

दुर्गम ठिकाणी मतदानाच्या साहित्यासह पोहोचले अधिकारी; गावकऱ्यांनी केले स्वागत


ही आहेत दुर्गम ठिकाणी -
कर्जतमधील ५४ क्रमांकाचे केंद्र तुंगी येथे असून डोंगरमाथ्यावरील या गावात ३४४ मतदार आहेत. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २७ किमी असून केवळ कच्च्या रस्त्याने अथवा पायवाटेनेच या ठिकाणी पोहचता येते. २७४ मतदार संख्या असलेले पेठ या ठिकाणी देखील १०१ क्रमांकाचे मतदान केंद्र असून याठिकाणी जीपने जाता येते. मात्र रस्ता अवघड आहे. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २४ किमी आहे. १७७ मतदार असलेले ढाक या वाडीमध्ये १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र असून मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर १० किमी आहे. येथेही अवघड रस्त्याने जावे लागते. १०० मतदार असलेले कळकराई हे १७९ क्रमांकाचे मतदान केंद्र आहे, हेदेखील केवळ छोट्या वाटेने जाण्यासारखेच आहे.

दुर्गम ठिकाणी मतदानाच्या साहित्यासह पोहोचले अधिकारी; गावकऱ्यांनी केले स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details