महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल - सुषमा सोनावणे

केंद्रीय लोकसेवेतील अधिकारी हे शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. तर शासकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी यांनी शासकीय कामे करताना लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा लाचलुतपत प्रतिबंध विभाग, अलिबागचे उपविभागीय अधिकारी सुषमा सोनावणे यांनी दिला.

By

Published : Oct 27, 2021, 10:17 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रायगड- केंद्रीय लोकसेवेतील अधिकारी हे शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. तर शासकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी यांनी शासकीय कामे करताना लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा लाचलुतपत प्रतिबंध विभाग, अलिबागचे उप विभागीय अधिकारी सुषमा सोनावणे यांनी दिला.

बोलताना सुषमा सोनावणे

दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त सहजसेवा फाउंडेशन खोपोली यांच्या वतीने अँटी करप्शन ब्युरो, रायगड यांच्या वतीने आज (27 ऑक्टोबर) लोहाना हॉल, खोपोली येथे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये वाढत चाललेल्या भ्रष्टाचार व त्यासंबंधी समाजात या गोष्टींविरुद्ध असलेले अज्ञान यातून प्रबोधन व्हावे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी विविध उदाहरण देत लाच विरोधी कायदे व त्यांची अंमलबजावणी सोप्या भाषेतून समजून सांगितली. त्यावेळी उपस्थितांनी लाच घेणे-देणे प्रश्न विचारून कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.

हे ही वाचा -महिला किसान दिनानिमित्त महिला किसान मेळावा संपन्न

ABOUT THE AUTHOR

...view details