महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुहागर ते बोरीवली महामंडळाची बस उतरली खड्ड्यात; प्रवाशी किरकोळ जखमी

ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानी जवळ खोदकाम केले आहे. या ठिकाणावरुन सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरिवली (एमएच 14 बीटी 2998) ही बस निघाली होती. तेव्हा अचानक ही बस खोदलेल्या खड्ड्यात उतरली.

महामंडळाची बस खड्ड्यात कलंडली...

By

Published : May 15, 2019, 11:28 PM IST

रायगड- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस खोदलेल्या खड्डयात उतरली. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

महामंडळाची बस खड्ड्यात कलंडली...


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदार कंपनी लार्सन ऍण्ड टूब्रोने शहरातील ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ मंदिराच्या कमानी जवळ खोदकाम केले आहे. या ठिकाणावरुन सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरिवली (एमएच 14 बीटी 2998) ही बस निघाली होती. तेव्हा अचानक ही बस खोदलेल्या खड्ड्यात उतरली. या अपघातात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.


अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक राज पवार तसेच कर्मचारी आणि पोलादपूरचे नगरसेवक उमेश पवार आणि सहकारी यांनी तातडीने प्रवाशांना अन्य वाहनात बसवण्यासाठी सहकार्य केले. अलिकडेच, ठेकेदार कंपनीने साईडपट्टी उकरून चौपदरीकरणासाठी पोलादपूर शहराच्या पश्चिम दिशेला कामास सुरूवात केली आहे. याठिकाणी सावधतेचे कोणतेही इशारे देणारे फलक लावले नसल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details