महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेरळमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोर पसार

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोर पसार झाला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार केली.

By

Published : Jan 23, 2021, 7:35 PM IST

neral
neral

रायगड - महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोर पसार झाला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार केली असून नेरळ परिसरात अशी पहिल्यांदाच घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांनी सोन्याची चैन व माळ केली लंपास

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील येत असलेल्या नेरळ माथेरान रेल्वे लाईन परिसरातील राजबाग येथे 23 जानेवारीच्या दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सदर महिला ही माथेरान येथील पंचवटीनगर येथे राहत असून नेरळ पाडा येथे राहत असलेल्या तिचे बहीणीसह भाचीला भेटण्यासाठी माथेरान रेल्वे लाईन मार्गाने नेरळ पाडा येथे पायी चालत असताना राजबाग सोसायटी परिसरात आली असता अज्ञात व्यक्तीने पाठीमागून येवून या महिलेच्या गळयातील एकूण 49 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व माळ असे सोन्याचे दागिने पळवून नेले आहे.

पोलीस यंत्रणा चोराच्या शोधात

या महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर माहिती पोलिसांना दिली असून नेरळ पोलीस सोनसाखळी चोराचा शोध घेत आहेत. नेरळ परिसरात पहिल्यांदाच महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून नेण्याची घटना घडल्याने आता महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या लग्न सराई व हळदी -कुंकवाचं सण असल्याने रस्त्यावर महिलांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details