महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा"

कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

corona virus
पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख

By

Published : Mar 7, 2020, 7:33 PM IST

रायगड - कोरोना विषाणूचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण आढल्याची अफवा पसरली असल्याने नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. त्यामुळे आयुक्त गणेश देशमुख यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरू नये, असे आवाहन पनवेलच्या जनतेला केले आहे.

"पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा"

हेही वाचा -महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'

पनवेल महापालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळले असल्याची अफवा काल दुपारपासून पनवेल पालिका क्षेत्रात पसरवली जात आहे. ही अफवा पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे जिल्हा चिकित्सक यांनी आपल्या महानगरपालिका क्षेत्रात 4 कोरोना रुग्ण आढळले आहेत अशा आशयाचे पत्र पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पाठविण्यात आले आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार अफवा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा -महिला दिन विशेष : वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपर रायडर' निशिगंधाने मिळवला 'हा' बहुमान!

ABOUT THE AUTHOR

...view details