महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खोपोलीतील शिवकालीन भैरवनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव

सालाबाद प्रमाणे या वर्षीही खोपोली येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भैरवनाथ मंदिरात दिपोत्सव करण्यात आला.. या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मंदिर परिसरात भव्य रांगोळीही काढण्यात आली होती..

By

Published : Nov 13, 2019, 8:36 PM IST

खोपोलीतील भैरवनाथ मंदिरात दिपोत्सव

रायगड - खोपोली शहरातील शिवकालीन भैरवनाथ मंदिरात, मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिवे लावत, दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मंदिराच्या प्रांगणात भव्य रंगोळीही काढण्यात आली होती. गेली अनेक वर्षे खोपोली येथे हा उत्सव साजरा होतो. शहरातील हजारो नागरिक येथील दीपोत्सवात सहभागी होतात.

खोपोलीतील शिवकालीन भैरवनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दिपोत्सव

हेही वाचा... जळगाव घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांवर अद्यापही कारवाई नाही; महापालिका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात

खोपोली शहरात रेल्वे स्थानकाजवळ शिवकालीन भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिर जरी पुरातन असले तरी काही वर्षांपूर्वी या मंदिराचा येथीळ स्थानिकांनी जीर्णोद्धार केला. तेव्हापासून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरात दीपोत्सव करण्यात येतो. शहरातील हजारो नागरिक येथे सांयकाळी येतात आणि परिसरात दिप प्रज्वलित करतात. रात्रभर मंदिराचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला असतो. भैरवनाथ मंदिराच्या येथे साजरा होणाऱ्या या दीपोत्सव बरोबर आणखी एक खास आकर्षण असते, ते म्हणजे मंदिर परिसरातील भव्य रांगोळी. या वर्षी देखील येथे भव्य रंगोळी काढण्यात आली होती.

हेही वाचा... २७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर, १६ शहरांमध्ये खुल्या वर्गातील महापौर

ABOUT THE AUTHOR

...view details