पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पनवेलमधील दहीहंडी आयोजक
पनवेल शहरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवावर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या दुःखाचे सावट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपले उद्ध्वस्त संसार पुन्हा बांधण्याचे प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी पनवेलमधील मोठ्या दहीहंडी आयोजकांनी माघार घेतली आहे. तर अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी आयोजनावर होणारा खर्च कमी केला आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पनवेलमधील दहीहंडी आयोजक
रायगड - पनवेल शहरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवावर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या दुःखाचे सावट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपले उद्ध्वस्त संसार पुन्हा बांधण्याचे प्रयत्न करत आहेत.
तक्का येथील साई तेज प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेली दहीहंडी ही पनवेलचे आकर्षण असते. या दहीहंडीला शेकडो गोविंदा पथक येऊन सलामी देतात. यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या बक्षिसांची अक्षरशः उधळण केली जाते. यावर्षी मात्र आयोजनावर खर्च कमी करून अगदी साधेपणाने दहीहंडी साजरा करण्याचा निर्णय साईतेज प्रतिष्ठानने घेतला आहे, अशी माहिती आयोजक तेजस यांनी दिली. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा उत्साह गोविंदांमध्ये असणारच त्याचसोबत पूरग्रस्तांना मदत करण्याचे सामाजिक भानही गोविंदा जपणार आहेत.