रायगड- मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मुंबई-पंढरपूर बसला खालापूरजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुखरूप आहेत. प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासाठी पाठविण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर बसला अपघात, प्रवासी सुखरूप
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मुंबई-पंढरपूर बसला खालापूरजवळ अपघात झाला आहे.
मुंबई येथून एसटी बस (एम एच ११ बी एल ९२८९) पंढरपूरकडे २३ प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर-वावंढळ गावाजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आली होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरने कट मारली. त्यावेळी चालक बस बाजूला घेताना टायर खराब असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली घसरली.
अपघातानंतर खालापूर पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसटी बसमधील २३ प्रवाशांना बाहेर काढून दुसऱ्या बसने पुढील प्रवासाला पाठवण्या आले. एसटी बसचे टायर हे खराब असल्याने हा अपघात झाला असून हा या बसचा दुसरा अपघात असल्याचे समजते. त्यामुळे एसटी प्रशासनाने बस प्रवाशांना घेऊन जाताना योग्य आहे की नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.