महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिडको आणि बिल्डरविरोधात ग्रामस्थांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त असून, त्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. सिडकोतर्फे देण्यात आलेले भूखंड विकसित करण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम प्रकल्पग्रस्त स्थानिकांना मिळावे ही प्रमुख मागणी या स्थानिक ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.

By

Published : Jul 14, 2019, 4:58 PM IST

सिडको आणि बिल्डर विरोधात ग्रामस्थांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

पनवेल -पनवेलमधल्या जावळे व बामणडोंगरी गावावर सिडको आणि बिल्डरकडून झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या वेळी जावळे हद्दीत सिडकोतर्फे देण्यात आलेल्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकांचा निषेध करून बांधकाम बंद करण्याची मागणी करण्यात आली.

सिडको आणि बिल्डर विरोधात ग्रामस्थांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त असून, त्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. सिडकोतर्फे देण्यात आलेले भूखंड विकसित करण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम प्रकल्पग्रस्त स्थानिकांना मिळावे ही प्रमुख मागणी या स्थानिक ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. सिडको प्रशासनाने १९७२ पासून स्थानिकांना केराची टोपली दाखवली असून त्यांच्या समस्या आजपर्यंत विचारात घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे प्रकल्पग्रस्त स्थानिकांनी सांगितले.

सिडको प्रशासन बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गाव कमिटीच्या अध्यक्षा नयना कडू यांनी केला आहे. आंदोलनात अनेक सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांनीही सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत या भूखंडावर बिल्डरने काम करू नये. अन्यथा होणाऱ्या अनर्थास संबंधित बिल्डर व सिडको प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा मोर्चाचे अध्यक्ष चिंतामण गोंधळी यांनी दिला आहे.

वहाळ ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार, सिडकोने दिलेले भूखंड ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतील त्या ठिकाणची बिल्डिंग मटेरियल सप्लायची कामे त्या गावाला देण्यात यावीत, असा ठराव मंजूर झाला होता. मात्र, बिल्डरने याबाबत स्थानिकांचा विचार न केल्यामुळे सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन तसेच साखळी उपोषण करत आहेत. या आंदोलनात गावातील तरुण, महिला, ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली आहेत. सिडको तसेच बिल्डरांना मागण्या मान्य नसतील तर संबंधित भूखंडावर पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details