महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अदिति तटकरेंची उमेदवारी धोक्यात? अपूर्ण माहितीप्रकरणी कादरी घेणार न्यायालयात धाव

श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिति तटकरे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. तटकरे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये एका गुन्ह्याची माहिती त्यांनी लपवली असल्याचा आरोप इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी केला आहे.

अदिति तटकरे , अकमल कादरी

By

Published : Oct 6, 2019, 8:03 PM IST

रायगड - श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिति तटकरे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. तटकरे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये एका गुन्ह्याची माहिती त्यांनी लपवली असल्याचा आरोप इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी केला आहे. त्यामुळे आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे कादरी यांनी सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

श्रीवर्धन मतदार संघातील उमेदवारीवरून शनिवारी अर्ज पडताळणीवेळी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली होती. पहिले राष्ट्रवादीतर्फे सेनेचे उमेदवार विनोद घोसळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. घोसळकर हे कोकण म्हाडाचे सभापती आहेत. यानंतर सेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार अदिति तटकरे यांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला होता. तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. दोघांनीही सरकारी लाभवरून परस्पर विरोधी आक्षेप नोंदवला होता. मात्र, घोसळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला.

हे सर्व प्रकरण सुरू असताना इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी पुन्हा अदिति तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवत अर्ज बाद करण्याची मागणी केली. सामना दैनिकात राष्ट्रवादी विरोधात आलेल्या आग्रलेखावरून ५ एप्रिल २०१८ साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिति तटकरे यांनी रोहा येथे आपल्या कार्यकर्त्यासोबत सामना अंकाची होळी केली होती. ६ एप्रिल रोजी त्यांच्यावर रोहा पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (3), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याची माहिती अदिति तटकरे यांनी लपवली असल्याचा आरोप करत इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी आपला आक्षेप दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कादरी यांची हरकत फेटाळून लावत अदिति तटकरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना संपूर्ण पुरावे देऊन देखील त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अदिति तटकरे यांच्या अर्ज वैध ठरवल्याने, या निर्णाया विरोधात आपण उच्चन्यायालयात दाद मागणार असल्याचे इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी सांगितले आहे. अकमल कादरी यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार अदिति तटकरे यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला असून, या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - पत्नीच्या आमदारकीसाठी हिंगोलीचे 'खासदार' नांदेडमध्ये अडकले

ABOUT THE AUTHOR

...view details