महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधील ७०२ तरुणांना मिळाले ‘ऑन द स्पॉट’ अपॉईंटमेंट लेटर

मल्हार रोजगार आणि सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला केवळ पनवेल, नवी मुंबईमधूनच नव्हे तर रायगड, उरण, पेण आणि कर्जतमधून तब्बल ३ हजार ३८० हजार तरुणांनी हजेरी लावली. या अभिनव उपक्रमामुळे पनवेलमधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

By

Published : Jun 10, 2019, 9:17 AM IST

पनवेलमधील 702 तरुणांना मिळाले ‘ऑन द स्पॉट’ अपॉइंटमेंट लेटर

पनवेल- दहावी, बारावी ते पदवीधर, एम.ए., एम.कॉम, एम.एस्सीपासून ते लॉ, इंजिनीयर, सीए आदीची डिग्री घेऊन नोकरीसाठी भटकणाऱ्या हजारो तरुणांची वणवण पनवेलमध्ये थांबली. मल्हार रोजगार आणि सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला केवळ पनवेल, नवी मुंबईमधूनच नव्हे तर रायगड, उरण, पेण आणि कर्जतमधून तब्बल ३ हजार ३८० हजार तरुणांनी हजेरी लावली. त्यापैकी हजार ७०२ तरुणांना नामांकित कंपनीमध्ये ‘ऑन द स्पॉट’ अपॉईंटमेंट लेटर मिळाले, तर ९२३ तरुणांना नोकरीसाठी कॉल लेटर देण्यात आले.

पनवेलमधील 702 तरुणांना मिळाले ‘ऑन द स्पॉट’ अपॉइंटमेंट लेटर

या अभिनव उपक्रमामुळे पनवेलमधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. काही तासांतच संपूर्ण सीकेटी महाविद्यालयाचे प्रांगण तरुणांच्या गर्दीने भरून गेले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगार आणि सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने या भव्य रोजगार मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यात आलेल्या एकूण ६८ नामांकित बँका, हॉस्पिटल, कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या तरुणांच्या मुलाखती घेतल्या व त्यापैकी ७०२ जणांना तत्काळ नोकरीचे अपॉईंटमेंट लेटर दिले.

बेरोजगार तरुणांना एकाच छताखाली नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे १५ वे वर्ष होते. आतापर्यंत जवळपास ७६८० तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. एरव्ही एखाद्या कंपनीत नोकरी मिळवायची असेल तर त्या कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असे, त्यातही संदर्भ देऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती ही नसायची. पण या भव्य रोजगार मेळाव्यामुळे संदर्भ देण्याची दरी कमी झाली असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
हा भव्य रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर, सागर माने, ऍड. चेतन जाधव, चिन्मय समेळ, मयूर नेतकर आणि सिकेटी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details