महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 604, तर 5203 कोरोनामुक्त

विभागातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 86 झाली आहे. विभागातील 6 हजार 241 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

By

Published : Jun 4, 2020, 5:19 PM IST

Pune Corona News
पुणे कोरोना बातमी

पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 604 झाली आहे. तर 5 हजार 203 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे सध्या 3 हजार 18 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

विभागातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 86 झाली आहे. विभागातील 6 हजार 241 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे ॲक्टिव रुग्णसंख्या 4 हजार 334 आहे. विभागात उर्वरित कोरोनाबाधित निरीक्षणाखाली आहेत. तर आत्तापर्यंत 511 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असुन बुधवारच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत गुरुवारी विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 9, सोलापूर जिल्ह्यात 55, सांगली जिल्ह्यात 2 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 91 हजार 919 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 90 हजार 669 अहवाल प्राप्त आहेत. तर 4 हजार 350 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details