रायगड- कोरोनामुळे देशभारात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र काही टवाळखोर संचारबंदीला झुगारुन गर्दी करुन पार्ट्या झोडत आहेत. अशीच मटणाची पार्टी करणाऱ्या तब्बल ४० जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आनंदावर विरजण; संचारबंदीत करायला गेले मटणाची पार्टी, पोलिसांनी पोहोचवले कारागृहात
पहुर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शुक्रवारी दुपारी मटणाची पार्टी करण्याचा बेत आखला. यासाठी सर्व साहित्य घेऊन सगळेजण गावच्या पाखर या परिसरात पोहोचले. त्यानंतर मटणाच्या पार्टीची जोरदार तयारी सुरू झाली. सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असताना कोलाड पोलिसांनी छापा मारुन त्यांच्या आनंदावर विरजण पाडले.
रोहा तालुक्यातील पहुर गावातील ग्रास्थांनी एकत्र येऊन शुक्रवारी दुपारी मटणाची पार्टी करण्याचा बेत आखला. यासाठी सर्व साहित्य घेऊन सगळेजण गावच्या पाखर या परिसरात पोहोचले. त्यानंतर मटणाच्या पार्टीची जोरदार तयारी सुरू झाली. सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असताना कोलाड पोलिसांनी छापा मारुन त्यांच्या आनंदावर विरजण पाडले. यावेळी पोलिसांनी तब्बल 40 ग्रामस्थांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
शासन आणि प्रशासन हे कोरोना लढाई जिंकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क लावा, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नका, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. मात्र अजूनही काही लोकांना हा खेळ वाटत असून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पहुर येथील 40 ग्रामस्थांनी हा आदेश मोडल्याने त्यांच्यावर कोलाड पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी पार्टीसाठी आणलेले सर्व साहित्य जप्त केले आहे. तर पुढील तपास पोलीस हवालदार एस. आर. माने करत आहेत.