महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजमाता जिजाऊंची आज 348 वी पुण्यतिथी, पाचाड येथील समाधी स्थळी विधीवत पूजन

राजमाता जिजाऊंची आज 348 वी पुण्यतिथी आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ याच्या समाधीस्थळी विधीवत पूजन करण्यात आले. दोन वर्षांपासून कोरोना संकट असल्याने यावर्षीही पुण्यतिथी कार्यक्रम हा साधेपणाने साजरा करण्यात आला.

Rajmata Jijau
Rajmata Jijau

By

Published : Jul 3, 2021, 5:05 PM IST

Updated : Jul 3, 2021, 5:18 PM IST

रायगड - राजमाता जिजाऊंची आज 348 वी पुण्यतिथी आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ याच्या समाधीस्थळी विधीवत पूजन करण्यात आले. महाडचे आमदार भरत गोगावले, जि.प. अध्यक्षा योगिता पारधी यांच्यासह शिवप्रेमींनी राजमाता जिजाऊ याना आदरांजली वाहून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

राजमाता जिजाऊंची आज 348 वी पुण्यतिथी
पाचाड येथे राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ -
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी राजमाता जिजाऊंचा वाडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसातच पाचाड येथील वाड्यात राजमातांचे देहावसान झाले. त्यानंतर वाड्याजवळ राजमाता जिजाऊ यांचे समाधीस्थळ बांधण्यात आले. दरवर्षी पुण्यतिथीदिनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी विधीवत पूजन केले जाते. आजही पाचाड ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रती वर्षी या समाधीस्थळी विधीवत पूजन आणि आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.


कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम संपन्न -

दरवर्षी राजमाता जिजाऊ याची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला जातो. पण दोन वर्षांपासून कोरोना संकट असल्याने यावर्षीही पुण्यतिथी कार्यक्रम हा साधेपणाने साजरा करण्यात आला. कमी लोकांच्या उपस्थितीत राजमातांच्या समाधी स्थळाचे पूजन करण्यात आले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Last Updated : Jul 3, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details