पुणे -जंगली प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जंगली वानरे टोळके करून लोकवस्तीत येऊन शेतमालाचे नुकसान करत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या खामुंडी गावात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे वानरांनी नुकसान करत धुमाकूळ घातला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
जंगली प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी भटकंती; पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल
जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या खामुंडी गावात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे वानरांनी नुकसान करत धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा -जुन्नरमध्ये बिबट्याचे बछडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जंगली प्राण्यांना जंगल परिसरात अन्न पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र, भटकंती करून अन्न मिळत नसल्याने हे प्राणी आता लोकवस्तीचा आश्रय घेत आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेली वानरे पिकांचे नुकसान करत असून शेवगा, कांदे आणि इतर उभ्या पिकांमध्ये शिरून नुकसान करत आहेत. वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांसाठी जंगल परिसरात अन्न पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करत आहे. जेणेकरून हे जंगली प्राणी अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत येऊन शेतमालाचे नुकसान करणार नाहीत.