महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार - उपमुख्यमंत्री

राज्यात दरडी कोसळून आणि भूस्खकलनामुळे दुर्दैवाने काही मृत्यू झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पूरग्रस्त भागात फिरत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजुनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्य सरकार सर्वोतपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

By

Published : Jul 25, 2021, 2:11 PM IST

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती - कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री अधिकारी समन्वय राखून पूर परिस्थिती हाताळत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजुनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

सोमवारी कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर -

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २५) कोरोना आढावा बैठक पार पडली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, दरडी कोसळून आणि भूस्खकलनामुळे दुर्दैवाने काही मृत्यू झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पूरग्रस्त भागात फिरत आहेत. मी देखील आज (रविवारी) साताऱ्यात तर उद्या सांगली आणि कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहे. असे ते म्हणाले.

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचा तातडीने पुरवठा -

या भागातील जनतेसाठी तातडीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. धान्यामध्ये तांदुळ, डाळ व अन्न शिजवण्यासाठी रॉकेल तसेच फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या पोहचवण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत असे ते म्हणाले.

अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग -

आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. अजुन काही मदत तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका होणार आहेत. पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू आहेत. अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर नद्यांमधून पावणे तीन लाख क्युसेकने पाणी अलमट्टीमध्ये जात आहे. नौदल, वायुदल तसेच सैन्यदल, एनडीआरएफ, एसटीआरएफ बचाव तुकड्या मदतीसाठी आलेल्या आहेत असे पवार यावेळी म्हणाले.

रामराजे नाईक-निंबाळकर खाजगी कामासाठी भेटीला -

रामराजे नाईक-निंबाळकर हे त्यांच्या कामासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाले ते निघून गेले. या संदर्भात काही बोलण्यासारखे नाही. सध्या आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावरील प्रश्नाला उत्तर दिले असे पवार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details