पुणे -ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. कडकोळ हे त्यांनी झपाटलेला आणि झपाटलेला 2 या चित्रपटातून साकारलेल्या ‘बाबा चमत्कार’ या व्यक्तिरेखेमुळे ते अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते.
लष्करात भरती होण्याची इच्छा असलेल्या कडकोळ यांना मेडिकल प्रॉब्लेममुळे जाता आले नाही. दरम्यान त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकांमध्ये लहान सहान भूमिका करायला सुरुवात केली. ‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका गाजली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातही त्यांनी काम केले होते.