महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीकरांनो कलंक म्हणून जगू नका - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्राचारासाठी प्रकाश आंबेडकर बारामती येथे आले होते. यावेळी त्यांनी पवार घराण्यावर जोरदार टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर

By

Published : Oct 16, 2019, 9:51 PM IST

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर प्रचारसभेत म्हणाले, बारामतीकरांनो कलंक म्हणून जगू नका, सत्तेचा गैरवापर देशाच्या अनेक गोष्टींशी संबंधित आहे. तो लवकरच उघड होईल. त्यामुळे येथे असलेल्या सत्तेपासून दूर रहा, अन्यथा बारामतीकरांच्या शर्टला डाग लागल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर केला आहे.

बारामती येथील प्रचारसभेत वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्राचारार्थ आंबेडकर बारामतीतील सभेत बोलत होते. काँग्रेस आघाडीसह युती सरकारवर टीका करताना ते म्हणाले, यशंवतराव चव्हांणानी उभारलेली सहकार चळवळ मोडीत काढल्यामुळे राज्याचा शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच राष्ट्रीय बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यामुळे मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून धडा घेण्याची गरज आहे. अन्यथा देशाची अर्थव्यवस्था बुडल्याशिवाय राहणार नाही.

बारामतीतील दुष्काळी पट्ट्यातील ४२ गावांसंबंधी ते बोलताना ते म्हणाले, या गावांसाठी केव्हाही पाणी आणता येऊ शकते. माञ, ते मागच्या आघाडी सरकारने व सध्याचे युती सरकार आणले नाही. देशात ५ टक्के वीज अधिक असताना दुष्काळी गावांपर्यंत पाणी पोहचवण्याऐवजी ते पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जात असेल तर, तो गुन्हा असल्याचे मी मानतो. वंचितची सत्ता येवो न येवो, ज्या भागातील प्रश्न आम्ही हाती घेतले आहेत. ते तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा - 'काँग्रेसला भारतरत्न हा फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे..'

ABOUT THE AUTHOR

...view details