महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पदवीधर निवडणूक : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था व संघटनांचा भाजपाला पाठिंबा

या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी घोषीत केली असून पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था व संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे.

various-organizations-support-bjp-candidate-in-lagislative-asembly-election-in-pune
पुणे पदवीधर निवडणूक : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था व संघटनांचा भाजपाला पाठिंबा

By

Published : Nov 30, 2020, 7:20 PM IST

पुणे - महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी घोषीत केली असून पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था व संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे.

भाजपा उमेदवारांना तब्बल ५७ संघटनांचा पाठिंबा-

या निवडणूकीत यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य, कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण ५७ संस्था व संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.

मोदी-फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विविध क्षेत्रातील संस्था व संघटनांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. या संस्था व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि पदवीधर मतदार भाजपा उमेदवारांना मतदान करतील, असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.

हेही वाचा -'भाजप कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला तिकीट देणार नाही'; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details