महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात दंग

अधून-मधून बरसणाऱ्या वरुण राजाच्या साक्षीने आज (सोमवार) जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी लाखो वारकरी तुकोबा - ज्ञानोबा, विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

By

Published : Jun 24, 2019, 10:02 PM IST

Updated : Jun 24, 2019, 11:29 PM IST

पुणे - अधून-मधून बरसणाऱ्या वरुण राजाच्या साक्षीने आज (सोमवार) जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी लाखो वारकरी तुकोबा - ज्ञानोबा, विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी देहू परिसर भक्तीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

पहाटे ५ वाजता पालखी सोहळ्याचे प्रमुख, अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते श्रींची शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायनमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर इनामदार वाड्यात श्रीसंत तुकोबांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. दुपारी साडेचारच्या सुमारास पालखीचे मुख्यमंदीरातून प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. ज्ञानोबा-माऊली तुकाराम'च्या जयघोषाने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

गेल्या २ दिवसांपासून वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले होते. अनेक वारकरी हे देहू ते पंढरपूर पायी वारी करतात. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो. मंगळवारी सकाळी अनगडशहा बाबा येथे मानाची पहिली आरती होते. त्यानंतर पुढे पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने पालखी मार्गस्थ होते. यावेळी लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात पुढे सरसावत असतात.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
Last Updated : Jun 24, 2019, 11:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details