महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळ्यात पर्यटकाचा धिंगाणा घालत हवेत गोळीबार; गुन्हा दाखल

ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. लोणावळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पिस्तूल जप्त केले आहे.

By

Published : Aug 9, 2020, 8:59 PM IST

लोणावळा पोलीस ठाणे
लोणावळा पोलीस ठाणे

पुणे - लोणावळ्यातील पर्यटनस्थळ सहारा ब्रिज येथे पर्यटकाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पर्यटक आणि त्याचे मित्र हे शासनाचे नियम झुगारून सहारा ब्रिजवर आले होते. वाहनात गाणी लावून धिंगाणा केला, त्याचवेळी मुख्य आरोपी पर्यटकाने परवानाधारक पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. लोणावळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पिस्तूल जप्त केले आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी पर्यटक सागर मोहन भूमकर (वय-35 रा.भूमकर वस्ती ता. मुळशी जि पुणे), संदीप हनुमंत जाधव (वय-36 वर्षे रा.नरे ता.मुळशी जि पुणे), सचिन बाळासाहेब भूमकर (वय-35 वर्षे रा.भूमकर वस्ती वाकड ता. मुळशी जि पुणे), सचिन साहेबराव मांदळे (वय-38 वर्षे रा.जांबे ता.मुळशी जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. मात्र, काही जण पोलीस प्रशासन आणि जिल्ह्याधिकारी यांचे नियम झुगारून थेट पर्यटनस्थळी पोहचत आहेत. शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास आरोपी पर्यटक सागर याच्यासह चार जण हे लोणावळा पोलिसांची नजर चुकवून सहारा ब्रिजकडे गेले होते. तिथे वाहनात गाणी लागून धिंगाणा करत हवेत गोळीबार केला. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी संबंधित पर्यटकांवर गुन्हा दाखल केला असून पिस्तूल जप्त केले आहे, अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details