महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस.. नागरिकांचा चांगला प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण 69 नाकाबंदी पॉईंट आहेत. शहरात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी 13 एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असून शहराअंतर्गत 56 पॉईंट आहेत. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आहे.

By

Published : Jul 14, 2020, 5:00 PM IST

Published : Jul 14, 2020, 5:00 PM IST

today-is-first-day-of-lockdown-in-pimpri-chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून (सोमवारी) दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आजच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवडकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच पुढील 9 दिवस असेच सहकार्य नागरिकांनी करावे, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे. दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कारवाई करत उठाबशा करायला लावल्या, तर काही ठिकाणी लाठ्यांचा प्रसादही देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस..
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण 69 नाकाबंदी पॉईंट आहेत. शहरात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी 13 एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असून शहराअंतर्गत 56 पॉईंट आहेत. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आहे. लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पथसंचलन करुन नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेऊन दोन्ही शहरात दहा दिवसाचे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून शहरात दहा दिवसांच्या लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच दुकाने पूर्णतः बंद असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details