महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 1, 2020, 1:13 PM IST

ETV Bharat / state

कोरोना नियंत्रणासाठी संवेदनशील शहरातील लोकसंख्या कमी करा- प्रकाश आंबेडकर

ज्या लोकांकडे खाजगी वाहने, बसेस आहेत त्या निर्जंतुककरून, सुरक्षा काळजी घेऊन त्यातूनही अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात यावे. ज्या ठिकाणी रेल्वे सुविधा नाही, अशा ठिकाणी या बसेस पाठवून देणे गरजेचे आहे. असे नियोजन केल्यास दाट वस्ती असलेल्या शहरांमधील लोकसंख्या कमी करून कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

prakash ambedkar on corona
प्रकाश आंबेडकर

पुणे- संवेदनशील असलेल्या शहरातील लोकसंख्या ३० टक्के कमी केल्यास किंवा स्थलांतर केल्यास कोरोनावरती नियंत्रण मिळवता येईल. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी शहरातील ३० टक्के लोकसंख्या स्थलांतरित करण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी किमान ३ दिवसांसाठी महाराष्ट्रापुरते रेल्वेसेवा सुरू करावी लागेल. भुसावळ, गोंदिया, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आणि राज्यातील सीमावर्ती भागापर्यंत रेल्वे वाहतूक चालवण्याची गरज आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गावी गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विलगीकरण केल्यावरच त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवावे. असे केल्याने गावकऱ्यांमध्ये स्थलांतरितांप्रती भीती राहणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवाय ज्या लोकांकडे खाजगी वाहने, बसेस आहेत त्या निर्जंतुककरून, सुरक्षा काळजी घेऊन त्यातूनही अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात यावे. ज्या ठिकाणी रेल्वे सुविधा नाही, अशा ठिकाणी या बसेस पाठवून देणे गरजेचे आहे. असे नियोजन केल्यास दाट वस्ती असलेल्या शहरांमधील लोकसंख्या कमी करून कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. राज्य सरकारने असे नियोजन केले तर कोरोनावर मात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे आपण मान्य केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा-'अवकाळीने कांदा पीक नेले अन् आता लॉकडाऊनमुळे काकडी शेतात सडतेय'

ABOUT THE AUTHOR

...view details