महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंभीर गुन्ह्यातील 3 गुन्हेगार पुण्यातून तडीपार; पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय-२५ रा.चाकण नानेकरवाडी), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय-२१ रा.चाकण नानेकरवाडी), अशी 2 वर्षे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर (वय-४० रा.आंबेगाव खेड) याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

By

Published : Jul 11, 2019, 12:41 AM IST

गंभीर गुन्ह्यातील 3 गुन्हेगार पुण्यातून तडीपार; पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

पुणे- चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 सराईत गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपार केले आहे. यामध्ये 2 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तर एकाला 1 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय-२५ रा.चाकण नानेकरवाडी), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय-२१ रा.चाकण नानेकरवाडी), अशी 2 वर्षे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर (वय-४० रा.आंबेगाव खेड) याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत आरोपी गणेश उर्फ गणी आणि चैतन्य सातपुते याच्यावर गर्दी, मारामारी करणे, दुखापत, अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न ,सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक संपत्तीची हानी पोहचविणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर याच्यावर दुखापत करणे, गर्दी, मारामारी, विनयभंग, दरोडा घालणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details