पुणे- शहरात वेगात असणाऱ्या गाड्यांना अचानक आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना पिंपरी-चिंचवडमध्येदेखील नुकतीच घडली. एका कारमध्ये बडवाने कुटुंब हे पुण्याहून निगडीच्या दिशेने जात असताना अचानक भरधाव कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली.
भरधाव कारला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला ५ जणांचा जीव
एका कारमध्ये बडवाने कुटुंब हे पुण्याहून निगडीच्या दिशेने जात असताना अचानक भरधाव कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली.
भरधाव कारला आग
बडवाने यांनी प्रसंगावधान दाखवत कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
कार मालक सतीश तुकाराम बडवाने (वय ६०) हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आपल्या घरी जात होते. कारममध्ये ते स्वतः तीन महिला आणि एक लहान मुलगी असे पाच जण होते.