पुणे - यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी आज (मंगळवारी) राज्यपालांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
राज्यातील ऊस गाळपाचा मुहूर्त आज ठरणार
दरवर्षी साखर गळीत हंगाम सुरू झाला की शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसत असते. मात्र, अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्याने कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत आहेत.
यंदाचा गळीत हंगाम किमान महिनाभर उशिराने सुरू होत आहे. साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. आधी अतिवृष्टी आणि आता राष्ट्रपती राजवट या दोन कारणांमुळे राज्यातील साखर गळीत हंगाम शुभारंभाची तारीख अजूनही जाहीर होऊ शकलेली नाही. तरीपण साखर आयुक्तालयाने केलेल्या नियोजनानुसार साधारण 25 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होईल. मात्र, ऊसाच्या कमतरतेमुळे यंदाचा साखर गळीत हंगाम अवघ्या 90 दिवसांचा असेल. त्यामुळेच राज्यात अवघ्या 162 कारखान्यांनी गाळपाचा परवाना मागितला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत105 कारखान्यांना गाळपाची परवाने मंजूर झाले आहेत. या हंगामात साखर उत्पादनातही किमान 40 टक्क्यांची घट होऊ शकते, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे.
दरवर्षी साखर गळीत हंगाम सुरू झाला की शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसतात. पण अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्याने कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत आहेत.