महाराष्ट्र

maharashtra

राजगुरुनगर येथे दुचाकीचा अचानक स्फोट; बाप, लेक गंभीर जखमी

By

Published : Jun 10, 2021, 3:16 PM IST

Updated : Jun 10, 2021, 9:48 PM IST

राजगुरुनगर येथील न्यायालयापासून ४०० मीटर अंतरावर नवीन दुचाकीचा अचानक स्फोट झाल्याने बाप लेक गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष प्रभाकर शेवाळे (वय ३२) व त्यांचा मुलगा यश प्रभाकर शेवाळे (वय १०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Santosh Shewale injured Rajgurunagar
संतोष शेवाळे जखमी राजगुरुनगर

पुणे -राजगुरुनगर येथील न्यायालयापासून ४०० मीटर अंतरावर नवीन दुचाकीचा अचानक स्फोट झाल्याने बाप लेक गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष प्रभाकर शेवाळे (वय ३२) व त्यांचा मुलगा यश प्रभाकर शेवाळे (वय १०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

स्फोटात जखमी झालेला मुलगा

हेही वाचा -कोरोना महामारीचे संकट पाहता पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा

संतोष प्रभाकर शेवाळे ( रा. तोरणा रेसिडेन्सी, अहिल्यादेवी चौक, राजगुरुनगर) हे त्यांचा मुलगा यश याला घेऊन पाणी आणण्यासाठी त्यांच्या हिरोहोंडा दुचाकीने (क्र. एमएच १४ जेएन ४३१७) जात होते. घरापासून १०० अंतरावर असताना त्यांच्या दुचाकीचा स्फोट झाला. यात संतोष शेवाळे यांचे दोन्ही पाय मांड्यांजवळ फाटले व रक्तबंबाळ झाले. तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाच्या आवाजाने अनेक जण स्फोट झालेल्या ठिकाणी गोळा झाले. अतुल ठाकूर, लाला सावंत, शंकर बोंबले यांनी जखमी संतोष व त्यांचा मुलगा यश याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गाडीच्या चिंधड्या उडाल्या.

संतोष शेवाळे यांनी तीन महिन्यांपूर्वी नवीन हिरोहोंडा गाडी घेतली होती. नवीन गाडी असतानाही तिचा स्फोट कसा झाला? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. हिरोहोंडा कंपीनीच्या नवीन गाडीचा स्फोट झाल्याने भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. नवीन गाडीचा स्फोट झाल्याने त्यास संबंधित कंपनी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून कंपनीने याबाबत तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा -पुणे जिल्हा रुग्णालयातील ओपीडी अविरतपणे सुरू

Last Updated : Jun 10, 2021, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details