पुणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) विकास संशोधन केंद्राच्या (Research and Development Center) वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिप या 200 विद्यार्थ्यांसाठी जाहिराती देण्यात आली आहे. त्यासाठी मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तारीखही देण्यात आली आहे. परंतु बार्टीच्या धरतीवर सारथी आणि महाज्योती जर सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिप देत असेल तर, आम्हाला सुद्धा फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राच्या समोर महाराष्ट्रातील 902 विद्यार्थी हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
आमरण उपोषण :महाराष्ट्रातून 902 विद्यार्थी पात्र झाले आहेत, परंतु त्यानंतर सुद्धा बार्टीकडून 200 विद्यार्थ्यांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणाच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. त्या आम्हाला द्याव्यात आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी. यासाठी हे विद्यार्थी सात तारखेपासून बार्टीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत (students hunger strike demand fellowship) आहेत.
प्रतिक्रिया देताना आंदोलक विद्यार्थी
शिक्षणाचा प्रश्न सोडवावा :आम्ही अनुसूचित जाती-जमातीचे आहोत. म्हणून हा अन्याय होतोय का ? हा मला प्रश्न पडत असल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केलेला आहे. शिंदे फडवणीस सरकार जाणून बुजून हे विद्यार्थी शिकून उद्या उठून ते आम्हाला प्रश्न विचारतील यासाठी हे करत आहे का? असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आमची मागणी आहे, आम्हाला सारथी आणि महाज्योतीप्रमाणे फेलोशिप देण्यात यावी आणि आमच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या विद्यार्थ्याने केलेली (students hunger strike in Pune) आहे.
अन्याय करत असल्याचा आरोप : फेलोशिपसाठी होणाऱ्या मुलाखती रद्द कराव्यात, कागद पडताळणी करून 902 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. अकोला, बीड, जालना, अशा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यातून हे विद्यार्थी येथे उपोषणाला बसले असून, पार्टीच्या संचालकाकडून आमची आणखी दखल घेतली नसल्याचे विद्यार्थी म्हणत आहेत ? तर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्याने घेतलेली आहे. ज्या बार्टीच्या धरतीवर सारथी आणि महाज्योती या संस्था स्थापन झाल्या. त्या चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना व्यवस्थित देत आहेत, मूळ संस्था असा दूजाभाव करून आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला (students hunger strike) आहे.
विद्यार्थ्यांना फेलोशिप :सारथी या संस्थेकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फेलोशिप दिले जाते. तर महाज्योती या संस्थेकडून ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांनाही फेलोशिप दिली जाते. तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी बार्टीकडून ही फेलोशिप देण्यात येते. आम्हाला या दोन्ही संस्थाप्रमाणे फेलोशिप द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.