महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील जनावरांना मिळणार आधार कार्ड क्रमांक; लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण सुरू

पाळीव जनावरांना लाळ्या खुरकूत या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. रोगाची लागण झाल्यास गाय म्हशींच्या दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे 13 तालुक्यांत 10 लाख पाळीव जनावरांना लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

By

Published : Oct 28, 2020, 12:53 PM IST

जनावरांना लसीकरण सुरू
जनावरांना लसीकरण सुरू

पुणे - जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 10 लाख पाळीव जनावरांना लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान जनावरांच्या कानावर बाराअंकी आधार क्रमांक असणारा टॅग (बिल्ला) लावण्यात येणार आहे. त्यामुळे पाळीव जनावरांना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. गजानन हांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन या दोन विभागाअंतर्गत ही मोहीम सुरू आहे.

पुण्यातील जनावरांना मिळणार आधार कार्ड क्रमांक

पाळीव जनावरांना लाळ्या खुरकूत या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. रोगाची लागण झाल्यास गाय-म्हशींच्या दूध उत्पादनात घट होते. तसेच इतर जनावरांना झाल्यास त्यांचे खुरे निकामी होत आहेतय या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी तात्काळ आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टर हांडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 13 तालुक्यात 10 लाख पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जनावरांना स्वतःची ओळख मिळवून देण्याचे काम राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे. यामध्ये प्रत्येक जनावराचे लसीकरण करुन, त्याला बिल्ला मारुन बारा अंकी नंबर असलेले आधार कार्ड तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक जनावरांची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या जनावरांना स्वतःची ओळख निर्माण होणार आहे.

जनावरांना लसीकरण सुरू

पाळीव जनावरांना आधारकार्डची ओळख..

जनावरांचे वय, वर्ण, जात, शिंग, शेपूट, लसीकरण, रेतन, गर्भधारणा, पूर्वीचे आजार अशी प्रत्येक नोंद आधार कार्डच्या माध्यमातून इंटरनेटवर लिंक केली जाणार आहे. यातून जनावरांची ओळख निर्माण होऊन जनावर कुठल्याही ठिकाणी गेल्यास त्याचे आजार व इतर माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

लाळ्या खुरकूतची लक्षणे

  • जनावरांना ताप येणे
  • सातत्याने लाळ गळणे
  • खुरांना जखमा होणे
  • जनावरांना श्‍वास घेण्यास त्रास होणे
  • गाई-म्हशींचा गर्भपात होणे

ABOUT THE AUTHOR

...view details