पुणे- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा सोहळा पार पडत आहे. जंगल परिसरामध्ये असलेल्या 'हेमाडपंती' काळातील शिवमंदिराला विद्युत रोषणाई व फुलमाळांनी सजविण्यात आल्याने या परिसरामध्ये मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर मंदिर सजले फुलमाळांनी
भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये पहाटेपासून पांढऱ्या शुभ्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली रोषणाई अगदी झळाळून निघाली आहे.
महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असताना देशभरातून अनेक भाविक भीमाशंकर चरणी दाखल झाले आहेत. या परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण व्हावा आणि भक्तीचा महासागर मना-मनात रुजावा यासाठी देवस्थानच्यावतीने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये पहाटेपासून पांढऱ्या शुभ्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली रोषणाई अगदी झळाळून निघाली आहे. त्यातच मंदिर परिसरामध्ये विविध रंगांच्या सुगंधी फुलांचा एक वेगळाच सुगंध दरवळत आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भक्तीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे.