पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी युतीच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष केल्याच्या बातम्या आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांना पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवले होते. महाजन यांनी नेहमीप्रमाणे यशस्वी मध्यस्थी करून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा मार्ग सूकर केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी केलेली शिष्टाई अखेर फळाला आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मावळमध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई फळाला; 'संकटमोचक' महाजनांच्या मध्यस्थीने बारणेंना गाठता आली सहज 'दिल्ली'
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी माढ्यातून आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक अटीतटीची होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी शिवसेनेला मदत न करण्याची भूमिकाही स्वीकारली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष दूत मानण्यात येणाऱ्या गिरीश महाजन यांना मावळ मैदानात उतरवले होते. मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मनोबल मिलन घडवून आणले. त्याचा परिणाम म्हणजे एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातून श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. श्रीरंग बारणे यांनीही हा पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव असल्याचा दावा विजयानंतर केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या या राजकीय उलथापालथीनंतर विधानसभा निवडणुकीतही कमी-जास्त फरकाने हेच चित्र कायम राहण्याची अपेक्षा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.