पुणे - शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवनेरीगडावर जन्मोत्सव साजरा होणार आहे. यासाठी आदिवासी पाड्यातील मुलांकडून शिवनेरीवर '101शिवबा सलामी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तलवारीबाजीसह विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यावेळी होणार आहेत.
शिवजयंती २०२०: शिवनेरीवर रंगणार आदिवासी चिमुकल्यांचा मर्दानी थरार...
शिवजयंतीनिमित्त छत्रपतींचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित कार्यक्रमात तेजूर येथील ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील 51 मुली तसेच स्थानिक ढोलपथक मर्दानी कला सादर करणार आहेत.
शिवजयंतीनिमित्त छत्रपतींचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यासाठी तेजूर येथील ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील 51 मुली तसेच स्थानिक ढोलपथक शिवनेरीवर जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात मर्दानी कला सादर करणार आहेत.