छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सोव, शिवनेरी गडावर तरुणाईची तुडूंब गर्दी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. या जन्मोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई शिवनेरी गडावर जल्लोषासाठी जमा झाली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. या जन्मोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई शिवनेरी गडावर जल्लोषासाठी जमा झाली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर उत्साहाचे वातावरण आहे.
रात्री १२ वाजल्या पासून शिवनेरी गडावर बाल शिवबाच्या आगमनासाठी प्रत्येकाचे डोळे आतुर झाले आहेत. आज मंगळवार सकाळी बाल शिवबाचे अंगाई गीत गाऊन जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी 'हर हर महादेव', छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. हातात भगवा, पुढे ज्योत आणि छत्रपतींच्या जन्माचा आजचा आनंद तरुणाईला एक वेगळी ताकद देत आहे. शिवनेरी गडावर बाल शिवबाच्या आगमनासाठी ढोल-लेझीम तलवारबाजी असे विविध खेळ या ठिकाणी सादर करण्यात येत आहेत.