पुणे- अतिवृष्टीमुळे लोणावळ्यात अंगावर पत्र्याचे शेड पडल्याने झोपेत असलेल्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना आज सकाळी लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. जखमी मुलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात अतिवृष्टीमुळे पत्र्याचे शेड कोसळले; भावाचा मृत्यू, बहीण जखमी
कुणाल अजय दोडके, असे मृत मुलाचे नाव आहे. तर नंदिनी अजय दोडके, असे जखमी मुलीचे नाव आहे.
पुण्यात अतिवृष्टीमुळे पत्र्याचे शेड कोसळले
कुणाल अजय दोडके, असे मृत मुलाचे नाव आहे. तर नंदिनी अजय दोडके, असे जखमी मुलीचे नाव आहे. हे दोघे भाऊ-बहीण होते. हे भाऊ-बहीण सकाळी घरात झोपेले असताना ही घटना घडली. त्यावेळी वडील अजय दोडके हे घराबाहेर पाऊस किती झाला ते पाहत होते. या घटनेनंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टारांनी अजयला मृत घोषित केले.